– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली प्रतिज्ञा
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट साधला लाभार्थ्यांशी संवाद
नागपूर :- सर्वसामान्य जनतेपर्यंत जनकल्याणकारी योजना पोहोचविणारी केंद्र शासनाची महत्वकांक्षी विकसित भारत संकल्प यात्रा शिबिर शनिवार ( ता.9) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, अमरावती रोड येथे संपन्न झाले. शिबिरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजारोच्या संख्येत उपस्थित युवकांना विकसित भारतासाठी ची प्रतिज्ञा दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रमूख उपस्थितीत “हमारा संकल्प विकसित भारत” असे म्हणत हजारों युवकांनी प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या देशभरातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधला. याचे थेट प्रक्षेपण कार्यक्रमात दाखविण्यात आले.
कार्यक्रमात आमदार सर्वश्री. प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, आशिष जयस्वाल, अभिमन्यू पवार, माजी मंत्री सुभाष देशमुख, माजी आमदार डॉ. मिलींद माने, सुधाकर कोहळे, डॉ. परिणय फुके, आशिष देशमुख, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, रा.तु.म नागपूर विद्यापठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, मनपा अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपायुक्त रवींद्र भेलावे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, समाज कल्याण अधिकारी रंजना लाडे, यांच्यासह माजी नगरसेवक बंटी कुकडे, नरेंद्र बोरकर, विजय झळके, दिलीप दिवे, सुनील अग्रवाल, प्रमोद तभाने, प्रमोद कौरती, अश्विनी जिचकार, तसेच शिवानी दानी यांच्यासह हजारों नागरिक उपस्थित होते.
आपल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थींपर्यंत वेळेत पोहोचेल, याची खात्री करून सरकारच्या प्रमुख योजनांच्या उद्देशाची परिपूर्णता करण्यासाठी देशभरात विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात येत आहेत. याला नागरिकांनी ‘मोदी की गारंटी की गाडी’ असे नाव दिले असून, देशभरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तरी नागरिकांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात सर्वप्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह इतर मान्यवरांनी नागपूर महानगरपालिकेच्या विकसीत भारत संकल्प यात्रा रथाचे अवलोकन केले. तसेच विविध शिबिरांच्या दालनाला भेट दिली.
नागपूर महानगरपालिकेतर्फे विकसीत भारत संकल्प यात्रेची माहिती देणा-या रथांद्वारे शहरामध्ये शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. झोनस्तरावर विविध भागांमध्ये शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येत असून, या शिबिरांना हजारोंच्या संख्येत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिबिराच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेद्वारे केंद्र शासनाच्या पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, ई-बस, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत योजना अशा विविध योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून दिला जात आहे. यासोबतच शासकीय योजनांमुळे लाभार्थ्यांना झालेला फायदा, मिळालेला लाभ ते स्वत: ‘मेरी कहानी, मेरी जुबानी’ च्या माध्यमातून आपल्या अनुभवातून व्यक्त केले आहे. शिबिरादरम्यान मनपाद्वारे विविष योजनांचा लाभ मिळविलेल्या लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शिबिराचा लाभ घेतला.