संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- मुंबईमध्ये २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी, जवान व कर्मचाऱ्यांना कामठी पोलिस दलाच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे व गुप्त विभागाचे अखिलेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून सामूहिक आदरांजली वाहण्यात आली.
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलिस अधिकारी, कर्मचारी, कमांडो, होमगार्ड व नागरिक अशा १७५ जणांना प्राण गमवावे लागले होते..या आठवणीला उजाळा देत कामठी पोलीस विभागातर्फे शहीद पोलिसांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक भातकुले,पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे, पोलीस उपनिरीक्षक आठवले, पोलीस उपनिरीक्षक पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे, प्रीती मोटघरे , यासह आदी पोलीस अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.