नागपूर :- पणन हंगाम 2023-24 मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत धान व भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमत केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. धानाच्या साधारण दर्जासाठी 2183 रुपये तर ‘अ’ दर्जा धानासाठी 2203 रुपये आधारभूत किंमत आहे.
आधारभूत धान खरेदी योजनेंअंतर्गत नागपूर विभागातील सर्व नोंदणीकृत केंद्रावर हमी भावाने धान खरेदी करण्यात येणार आहे. अधिक माहिती करिता अन्न, नागरी पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे उपायुक्त (पुरवठा) यांनी कळविले आहे.