नागपूर :- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आदरांजली अर्पण करण्यात आली.
महसूल उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांनी इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, चंद्रभान पराते, विवेक इलमे, कमलकिशोर फुटाणे, तहसीलदार महेश सावंत,आर.के. डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.