राजेंद्र बागडे,नरखेड तालुका प्रतिनिधी
– ग्रा.पं.चे ग्रामसेवक,ऑपरेटर गैहजर, नागरिकांना हेलपाटे
नरखेड :- स्थानिक नरखेड तालुक्यातील जलालखेडा सर्कल अंतर्गत पेठ मुक्तापूर गट ग्रामपंचायतचा कारभार सध्या रामभोरोसे असल्याची तक्रार ग्रामपंचायतचे सदस्य योगेश नारनवरे यांनी केली आहे. पेठ मुक्तापूर गट ग्रामपंचायत ही कधीही नागरिकासाठी सुरु राहात नसून कुलूप बंद अवस्थेत असते तर येथील ग्रामसेवक,ऑपरेटर, चपराशी, कधीही ग्रामपंचायत मध्ये दिसून येत नसल्याने नागरिकांना लागणारे काही आवश्यक कागदपत्रे रहिवाशी दाखला, जन्माचा दाखला व इतरही काही आवश्यक दाखले कोण देणार कर्मचारी ग्रामपंचायत मध्ये राहात नसल्याने नागरिकांची ओरड आहे कामे होत नसल्याने नागरिकांना चकरा मारून हेलपाटे खावे लागतात. उलट त्याना फोन केला तर मी बाहेर आहे मिटिंग ला आहे असे उडवाउडवीची उत्तर देऊन आपली बाजू छाप ठेवतात कर्मचारी हे कोणासाठी आहे आणि कशासाठी शासन यांना पगार देतो याला दोषी कोण असा सवाल येथील नागरिकांनी केला आहे. ऑपरेटर जन्म दाखल्यासाठी उगाच नागरिकांना त्रास देतो काही नावात बदल नसल्याने एपीट्यूडड करून आणायला लावतात ग्रामपंचायत स्तरावर दुरुस्त करून देता येतो पण ते कानाडोळा करून नागरिकांना उगाच त्रास देतात्त ऑपरेटर नागरिकांना बिना कामाचे त्रास देत असेल तर हे खपवून घेणार नाही नागरिकांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा ग्रामपंचायत समोरच आंदोलनाला बसेल असा इशारा पेठ मुक्तापूर गट ग्रामपंचायतचे सदस्य योगेश नारनवरे यांनी दिला आहे.