तारसा रोड ओव्हरब्रिज जवळ रेल्वे अपघातात इसमाचा मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड ओव्हर ब्रिज जवळ रेल्वे अपघातात एका इसमाचा मृत्यु झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादीच्या तक्रारीने मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .

प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.४) ऑक्टोंबर ला फिर्यादी भारत अमरसिंह माक्रो वय ३८ वर्ष रा. ग्राम पंचायत चंदवाही ता. सेहपुरा जि. डिगडोलो. ह. मु. तारसा रोड ओव्हरब्रिज जवळ कन्हान हे जावई मृतक रमेशसिंग पलकुसिंग कुलस्ते वय ३५ वर्ष रा. ग्राम पंचायत चंदवाही ता.सेहपुरा जि.डिगडोलो, ह.मु. तारसा रोड ओव्हरब्रिज जवळ कन्हान यांचा सह १४ लोकांना घेऊन तारसा ओव्हरब्रिज जवळ रेल्वेचे केब ल लाईन टाकण्याकरिता कामाला आले होते. शनिवार (दि.१४) ऑक्टोंबर ला सकाळी ७ वाजता दरम्यान भारत अमरसिंह माक्रो काही लोकांना घेऊन परिसरात फिरायला निघाले असता तारसा रोड ओव्हरब्रिज च्या रेल्वे गेट जवळ जावई मृतक रमेशसिंग पलकुसिंग कुलस्ते यांचा मृतदेह मिळुन आला. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना दिल्याने घटनास्थळी पोलीस पोहचुन पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेत शववि च्छेदना करिता कामठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असुन कन्हान पोलीसांनी फिर्यादी भारत अमर सिंह माक्रो यांचे तक्रारीने पोस्टे कन्हान ला मर्ग क्र. ४७ /२३ कलम १७४ जा.फौ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात स फौ खुशाल रामटेके, सम्राट वनपर्ती हे करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवरात्री विशेष हातमाग प्रदर्शनाचा नागपूरकरांनी लाभ घ्यावा - गाडीलकर

Mon Oct 16 , 2023
– गोंडवाना गॅलरीत सोमवारपर्यंत आयोजन नागपूर :- नवरात्री सणाच्या शुभारंभप्रसंगी 15 व 16 ऑक्टोबरला राज्य हातमाग महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विशेष हातमाग प्रदर्शनाचा लाभ नागपूरकरांनी घ्यावा. मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी या ठिकाणी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे वस्त्रोद्योग आयुक्त गोरक्ष गाडीलकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाद्वारे नवरात्री निमित्त गोंडवाना गॅलरी, रामदासपेठ नागपूर येथे 15 ऑक्टोबर 2023 रोजी राज्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!