नागपूर :- राजस्थानच्या उदयपूर शहरात दि. 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टॉंबर 2023 दरम्यान होणा-या तिस-या राष्ट्रीय दिव्यांग टी-20 क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणा-या विदर्भ क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे. विदर्भ क्रिकेट दिव्यांग संघटनेतर्फ़े संघाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली असून या संघात सारंगचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय दिव्यांग क्रिकेट संघटनेतर्फ़े मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथे नुकत्याच आयोजीत करण्यात आलेल्या महापौर चषक दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर सारंग चाफ़लेची निवड करण्यात आली आहे. सारंग याने दिव्यांग क्रिकेट विश्वात भारताकडून म्हणून भरीव कामगिरी केली असून जन्मतः पोलीओमुळं एक पाय अधु असलेला सारंग क्रिकेटसोबतच शैक्षणिकदृष्ट्याही स्वालंबी आहे. अष्टपैलू म्हणून आंतरराष्ट्रीय नावलौकीक असलेला सारंग हा महावितरणच्या बुटीबोरी विभागातील 33/11 केव्ही निलडोह उपकेंद्रात येथे यंत्रचालक म्हणून कार्यरत असलेल्या सारंगने डवखुरी गोलंदाजी आणि फ़लंदाजी करीत भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात अष्टपैलू म्हणुन स्थान मिळविले आणि आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर हे स्थान बळकट केले आहे.
सारंगच्या या निवडीबद्दल महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी,नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफ़ुल्ल लांडे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, विदर्भ क्रिकेट दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय भोसकर यांचेसह अनेकांनी सारंगचे अभिनंदन केले आहे.