किराड़ समाजाचा भुजेलिया व स्नेहमिलन संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- किराड समाज व्दारे कन्हान येथे भुजोलिया उत्सव साजरा करित स्नेहमिलन कार्यक्रमात मान्यवरांचा व विद्यार्थ्याचा सत्कार करून भुजोलिया उत्सव थाटात साजरा करण्यात आला.

गुरूवार (दि.३१) ऑगस्ट २०२३ ला सकाळी श्री तुकाराम मंदीर, तुकाराम नगर कन्हान येथुन किराड समाज बांधवानी भुजोलिया शोभयात्रा काढुन श्री हनुमान मंदिर, इंदिरा नगर कन्हान येथे भुजोलिया चे विसर्जन करून जव देवाला चढवुन मोठया लोकाना प्रणाम करित त्यांचा आशिर्वाद घेऊन एकतेचा व प्रेमा चा संदेश दिला. तदंनतर सायकाळी डोणेकर सभागृहा त समाज बांधवाच्या स्नेहमिलन कार्यक्रमात मान्यवरां चा तसेच समाजातील १० व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी किराड समाज कन्हान अध्यक्ष नारद दारोडे, विशाल बरबटे, शरद डोणेकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमा चे सुंदर सुत्रसंचालन ज्ञानेश्वर दारोडे यानी तर नत्थुजी नन्होरे यांनी आभार व्यकत केले. स्नेहभोज करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता संजय मोहने, नितेश लुहूरे, नत्थुजी नन्होरे, अशोक खंडाइत, माधव काठोके, चंपाबाई दारोडे, प्रीती गड़े, स्वाती लुहुरे, किशोरी काठोके, आकांक्षा दारोडे, कल्पना हारोड़े सह समाज बांधवानी बहु संख्येने उपस्थित राहुन सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकर-यांना आर्थिक मदत द्यावी: डॉ. भारती पवार

Sat Sep 2 , 2023
– महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट विचारात घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली निवेदनाद्वारे मागणी  नाशिक :- राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे राज्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने महिनाभर दडी मारली आहे. त्यामुळं जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद झाले असून पावसाने पाठ फिरवल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक ठिकाणी पाणीसंकट निर्माण झालं असून त्यामुळे राज्यासह नाशिक जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिति ओढवली असल्याने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!