मुंबई :- अशासकीय बालगृह, बालकाश्रम येथे काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना अन्य सरकारी बालगृहाप्रमाणे निश्चित मानधन देण्याबाबत लवकरच एक समिती नेमण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
सन 2022 च्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने आज महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आमदार राजेश राठोड, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.
मंत्री तटकरे म्हणाल्या की, शासनाच्या बालगृहाप्रमाणे राज्यात असलेली अशासकीय बालगृह, बालकाश्रमात काम करणाऱ्या अधीक्षक व समुपदेशकांना इतर सरकारी बालगृहाप्रमाणे निश्चित मानधनाबाबत तसेच बांधकामाचे क्षेत्रफळ तीनपट वाढीव मिळावे या आश्वासनाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी एक समिती नेमण्यात येईल, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.