शाहू महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची पाहणी 

नागपूर :- बहुजन राजे राजर्षी छत्रपती शाहू यांचा भव्य पुतळा मेडिकल चौकात बसवावा या मागणीसाठी बसपा मागील वीस वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. बसपा अनेक वर्षापासून शाहूंच्या स्मारकाच्या नियोजित ठिकाणी दरवर्षी शाहूंची जयंती, स्मृतिदिन व आरक्षण दिन असे वर्षातून तीन कार्यक्रम घेत असते. अलीकडे 5 मे 22 ला मनपा आयुक्त राधाकृष्णन व 18 ऑगस्ट 23 ला मनपा आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी यांना निवेदने देऊन निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रथमत:च मनपाने पुढाकार घेऊन बसपा नेत्यांना जागेच्या पाहणीसाठी बोलावून घेतले.

छत्रपती शाहू महाराज 1920 व 1942 ला बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत नागपुरात दोनदा येऊन गेले. परंतु त्या बहुजन राज्याचा नागपुरात एकही पुतळा किंवा स्मारक नव्हते. 2002 रोजी बसपाचे 9 नगरसेवक निवडून आल्यावर एडवोकेट अशोक यावले बसपाचे पक्षनेता असताना त्यांच्या पुढाकाराने शासकीय रुग्णालयाचे (मेडिकल) मुख्य प्रवेशद्वार व मेडिकल चौक यामधील खुली जागा जिथे हल्ली अनेक हॉकर्स चे स्टाल आहेत त्या ठिकाणी शाहूंचा पुतळा उभारण्याचा नागपूर मनपा ने एकमताने निर्णय घेतला. त्यानंतर जागेची पाहणी करण्यात आली. त्याचा नकाशा मंजूर करण्यात आला. त्यासाठी बजेटही मंजूर झाले. अनेक विभागातील ना हरकत सुद्धा मिळवण्यात आले.

नागपुरात गडकरी सारखा हेवीवेट केंद्रीय नेता राहतो, फडणवीस सारखा कर्तव्यदक्ष? उपमुख्यमंत्री राहतो, तरीसुद्धा शाहू बाबासाहेबांच्या स्मारका चा प्रश्न 30 वर्षापासून व शाहूंच्या स्मारकाचा प्रश्न 20 वर्षापासून प्रलंबित का? राहतो. येथे भाजप-सेना, काँग्रेस-राकाँ ची सरकारे गल्ली ते दिल्ली पर्यंत आहेत तरी ही स्मारके पूर्णत्वाला का जाऊ शकले नाही. ही नेतेच तर महापुरुषांच्या स्मारकाच्या विरोधी तर नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.

आज मेडिकल चौकात जागेची पाहणी करताना मनपाचे इंजिनियर सिंग, इंजिनीयर आगरकर, बसपाचे नागपूर जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, मा प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, दक्षिण नागपूरचे प्रभारी नितीन वंजारी, दक्षिण पश्चिमचे महासचिव सुरेंद्र डोंगरे, दक्षिणचे महासचिव विलास मून, युवा नेते चंद्रशेखर कांबळे, दक्षिण नागपूरचे सचिव संभाजी लोखंडे, दिलीप मून, विजय लोखंडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आजारास कटाळुन विहिरीत उडी घेत बबन मोहने ने केली आत्महत्या

Fri Aug 25 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- सहा महिन्यापासुन आजारी असुन मोति बिंदुची शस्त्रक्रिया केली. तरी आजार बरा होत नसल्याने आजाराच्या त्रासाला कंटाळुन बोरडा येथिल बबन मोहने हयानी रात्री ला शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बोरडा (गणेशी) येथील शेतमजुर बबन उरकुडा मोहने वय ४४ वर्ष रा. बोरडा (गणेशी) हा ६ महिन्यापासुन आजारी असुन त्याने मोतिबिंदु ची शस्त्रक्रिया केली तरी सुध्दा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!