मुंबई :-लेहजवळ झालेल्या दुर्घटनेत भारतीय लष्कराच्या काही जवानांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेले सर्वजण लवकरात लवकर बरे होवोत अशी प्रार्थनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
यासंदर्भात Xवरून लिहीलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की;
लेहजवळ झालेल्या दुर्घटनेत आपण भारतीय लष्कराचे जवान गमावल्याच्या घटनेने मला व्यतिथ केले. या सर्वांनी देशाप्रती बजावलेली अजोड सेवा कायमच स्मरणात राहील. या दुर्घटनेमुळे दुःख ओढावलेल्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे होवोत अशी प्रार्थनाही करतो : पंतप्रधान @narendramodi