नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार (ता.17) 8 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे श्री कमलेश्वर अपार्टमेंट, गजानन नगर, वर्धा रोड, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. गंधे कॉमर्स क्लासेस, रामदासपेठ, नागपूर, मे. ओसिएन स्टिचींग मशिन ट्रेनिंग सेंटर, राहुल मार्केट, सिताबर्डी, नागपूर व मे. भांगे अकॅडमी, राज नगर, छावनी, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला.
हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. न्यु अभ्यास अकॅडमी, बँक कॉलोनी नरसाळा, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. राऊत किराणा शॉप, आनंद नगर, बिनाकी, नागपूर नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारेमे. हितेश हॉईटस, ओम नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. उत्तर दक्षिण रेस्टॉरेंट, माऊंट रोड, सदर, नागपूर यांच्यावर कचऱ्याचे विलगीकरण न केल्याने आणि ड्रेनेज लाइन ब्लॉक केल्याबाबत कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.