देवलापार :- येथील फिर्यादी यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. देवलापार येथे अप. क्र. १४४/२१ कलम ३५४(अ) भादवि सहकलम ८, १२ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता. यातील फिर्यादी व आरोपी पुरूषोत्तम बाबुलाल कोकोडे, वय ३५ वर्ष, रा. जुनेवाडी देवलापार हे एकाच गावात आजुबाजुला राहत होते. यातील आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन पिडीत मुलीला आधारकार्ड काढण्याकरीता घेवुन गेला व परत येताना आरोपीने स्वतःच्या शेतात पिडीतेला नेवुन तिला लज्जा येईल असे बोलून पिडीतेचा विनयभंग केला.
सदर प्रकरणाचे तपास सहायक पोलीस निरीक्षक निशा भुते यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा.कोर्टामध्ये सादर केले. आज दिनांक १२/०७/२०२३ रोजी मा. कोर्ट विद्यमान न्यायाधीश एक्स्ट्रा डी. जे. पांडे नागपूर यांनी वरील नमुद आरोपीस कलम ८ पोक्सो मध्ये ०३ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी परसोड़कर यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन पोलीस हवालदार रणजित जाधव पोस्टे देवलापार यांनी मदत केली आहे.