– स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणची कारवाई
नरखेड :-दिनांक ०७/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील स्टाफ अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन नरखेड हद्दीतील पिलापुर, बरड, मोवाड येथे सार्वजनिक ठिकाणी काही इसम ५२ तासपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहीती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त झाली या वरून सदर पथकाने पिलापुर बरड मोवाड येथे सापळा रचुन छापा टाकून आरोपी नामे- १) योगेश ज्ञानेश्वर बोबडे, वय २९ वर्षे, रा. वार्ड क्र. १२ मोवाड जि. नागपुर २) रूपेश रामदास सुर्यवंशी वय २४वर्ष रा. वार्ड क्रं १२ मोवाड ३) होमेश्वर मधुकर धकिते, वय ३३ वर्षे, वार्ड क्रं १ आठवडी बाजार जलालखेडा ४) रमेश बाबुराव कोकाटे, वय ५३ वर्षे रा. वार्ड क्रं. ०३ मदना जलालखेडा ५) विलास रामनावसिंह चव्हाण, वय ४० वर्षे वार्ड क्रं ०४ बेलोना ६) दिनेश रतन चौरसिया, वय २७ वर्षे वार्ड क्रं ०७ बेलोना ७) सचिन रमेश वानखेडे, वय ३१ वर्षे वार्ड क्रं. ०३ बेलोना ८) विलास गजानन मानेकर, वय ३३ वर्षे वार्ड क्रं ०३ जलालखेडा हे जुगार खेळतानी मिळुन आले. एकुण ०८ जुगारी इसम यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातून १) ५२ तासपते, ताडपत्री, नगदी २१६००/- रु. रोख रक्कम असा एकुण २२१२५/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीताविरूध्द पोलीस ठाणे नरखेड येथे अप क्र. २८५ / २०२३ कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण, सहायक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकुर, सहायक फौजदार चंद्रशेखर पडेकर, पोलीस हवालदार प्रमोद तभाने, दिनेश आधापुरे, पोलीस शिपाई राहुल सावळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.