उद्धव ठाकरे यांचा आणखी एक शिलेदार शिंदे यांच्या शिवसेनेत

मुंबई :- राज्यातील राजकारणात वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांना बसणारे धक्के काही कमी होत नाही. शिवसेनेतील एक एक नेते त्यांची साथ सोडून जात आहेत. वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांना सोडून ४० आमदार गेले. त्यानंतर गेल्या वर्षभरात राज्य अन् जिल्हापातळीवर अनेक नेते उद्धव ठाकरे यांना सोडून गेले. आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. शिवसेना ठाकरे गटातून त्या एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्या. मुंबईत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.

काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे

नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामांमुळे देशाचा विकास झाला आहे. मोदी यांनी राम मंदिराची उभारणी, कलम ३०७ कलम हे प्रश्न सोडवले. महिलांचा प्रश्न आणि देशाचा विकास हा मुख्य उद्देश ठेऊन मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा अंधारे यांचे महत्व उद्धव ठाकरे यांच्या गटात वाढल्यामुळे आपण नाराज झाल्या का? या प्रश्नावर त्यांनी नकार दिला. माझी भूमिका विकासाची आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकास होत आहे. त्यामुळेच मी त्यांच्यसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुणे में ED की बड़ी कार्रवाई, 429 करोड़ के घोटाले में बैंक का पूर्व अध्यक्ष गिरफ्तार

Fri Jul 7 , 2023
पुणे :- महाराष्ट्र के पुणे शहर में 429 करोड़ के घोटाले के मामले में बैक के पूर्व चेयरमैन अमर मूलचंदानी को अरेस्ट किया गया है. यह गिरफ्तारी प्रवर्तन निदेशालय (ED) की ओर से की गई है. सेवा विकास बैंक के पूर्व चेयरमैन मूलचंदानी को ईडी ने कोर्ट में पेश किया. कोर्ट ने 7 जुलाई तक मूलचंदानी को ईडी की कस्टडी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com