नागपूर :- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचे नागपूर विमानतळावर मंगळवारी दुपारी आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या तीन दिवसीय दौऱ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपूर येथे आले आहेत.
विमानतळावर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी त्यांचे स्वागत केले.
राज्यपाल तीन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर असून उद्या ते गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत. तसेच नागपूर येथील कोराडी स्थित विद्याभवनाच्या सांस्कृतिक केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये ते उपस्थित राहणार आहेत.