– विभागीय आयुक्त कार्यालय
नागपूर :- माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. उपायुक्त (सामान्य प्रशासन) प्रदिप कुळकणी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी आयुक्त कार्यालयातील अधिकारी शंकर बळी, अमित हाडके तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी यांनीही वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
विधानभवन परिसर
विधानभवन परिसरात वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
विधानभवनाचे कक्ष अधिकारी कैलास पाझारे, कार्यकारी अभियंता संतोष जाधव, महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गणेश राठोड, पाणी पुरवठाचे मुख्य अभियंता विष्णु राठोड, शाखा अभियंता संदीप चाफले, लेखाधिकारी रामसिंग पवार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सर्वश्री प्रा. मोहन चव्हाण, डॉ. मधुकर नाईक, डॉ. तुषार राठोड, तुकाराम चव्हाण, श्रीराम चव्हाण, प्रेमचंद राठोड, राजेश राठोड, मुकूंद अडेवार, राजश्री राठोड, संगिता राठोड, नलिनी पवार, सखाराम जाधव, उत्तम चव्हाण, अशोक पवार तसेच विधानभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनीही वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालय
जिल्हाधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.