रामटेक :- तालुक्यातील तथा नागपुर – जबलपुर महामार्गावरील मनसर येथे दि. २९ जुन ला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास रामटेक मार्गावरील भक्तीधाम येथुन विठ्ठल देव रुख्मिणी देवी यांची कावड यात्रा काढण्यात आली होती.
भक्तीधाम येथुन कावडयात्रा निघुन गावभ्रमणासाठी निघाली. दरम्यान यावेळी माजी आमदार तथा भाजपा रामटेक विधानसभा क्षेत्राचे नेते मल्लीकार्जुन रेड्डी हे उपस्थित होते. कावडयात्रेत मोठ्या संख्येने भाविक भक्तगण सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांमध्ये माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांचेसह पंचायत समिती उपसभापती नरेंद्र बंधाटे, माजी न.प. उपाध्यक्ष प्रभाकर खेडकर, गांधी रेड्डी, मनसर ग्रा.पं. सरपंच कैलास नरुले, मनोज मलघाटे, ठाकरे यांचेसह भावीक भक्तगण उपस्थीत होते.