संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रणाळा येथील फ्रेंड्स कॉलोनीत एका कुलुपबंद घरातुन अज्ञात चोरट्याने 6 हजार 100 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व नगदी 7 हजार 200 रुपये असा एकूण 13 हजार 300 रुपयांची घरफोडी केल्याची घटना गतरात्री साडे आठ दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी राजू अब्दुल शेख वय 49 वर्षे रा फ्रेंड्स कॉलोनी रणाळा ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 457,380 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी हे 3 जून ला आपल्या परिवारासोबत त्यांचे भावाचे मुलीचे लग्न समारंभात सहभागी होण्यास गेले व दुसऱ्या दिवशी रात्री 8 दरम्यान घरी परतले असता घरी चोरी झाली असून घरातील लोखंडी कपाटातील ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने किमती 6100 रुपये व नगदी 7200 रुपये असा एकूण 13 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला असता यासंदर्भात पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.