संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– शहर स्वच्छतेची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक असल्याने
-पूर्व नियोजनाला आली गती
कामठी :-पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात होणारी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पावसळयापूर्वी शहरातील नाले साफ सफाई करून शहर स्वच्छतेची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक असल्याने कामठी नगर परिषद ने पूर्व नियोजन करणेहेतू मान्सूनपूर्व कामाला गती दिली आहे. यानुसार मान्सूनपूर्व तयारीचा एक भाग म्हणून कामठी शहरातील नाले सफाईला गती देणे सुरू करण्यात आले आहे.
कामठी शहरातील मोठमोठ्या नाल्याची दयनीय अवस्था झाली असून त्या मोठ्या नालयामध्ये कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता त्याची स्वछता करण्याची गरज होती तसेच पावसाळ्याच्या दिवसात स्वछतेच्या अभावी मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते त्यामुळे शहराची स्वछताची कामे पावसाळ्याच्या आधी होणे आवश्यक आहे यासाठी कामठी नगर परिषद तर्फे मान्सूनपूर्व कामाला गती देण्यात आली आहे.