– 11 फेब्रुवारी पर्यंत आपले प्रस्ताव आमंत्रित
नागपूर दि.31 : राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना 2021-22 राज्य शासनातर्फे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत मदरसांना पायाभूत सोयी सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
सर्व पात्र मदरसांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपले प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (गृह शाखा ) येथे दिनांक 11 फेब्रुवारी पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा नियोजन अधिकारी यांनी केले आहे.