संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– उद्या समूह होणार दिल्ली रवाना
पारशिवनी :- भारत स्काउट्स आणि गाईड्सचें राष्ट्रीय मुख्यालय आणि नेशनल यूथ एडवेंचर इंस्टिट्यूट , हरियाणा यांच्या अंतर्गत नेशनल यूथ कॉम्प्लेक्स, गड़पुरी हरियाणा येथे 86 वे नेशनल एडवेंचर कॅम्प आयोजित करण्यात आले आहे . या कॅम्पसाठी नागपुर जिल्ह्यातील खापरखेडा आणि पारशिवनीचे एकूण आठ स्काऊट्स आणि पाच गाईड्सची निवड झालेली आहे, ज्यामध्ये गाईड सानिया सैय्यद, आयेशा सैय्यद, माहिम शेख, कनक चावके, स्वर्णिका शाह तशेच स्काऊट नीरज नागोसे, हर्षल नागोसे, ओम भोगे, नीलेश बिसन, अंशुल बाजनघाटे , आदित्य शाह, यश चावके, प्रशिक पाटिल यांचा समावेश आहे . सर्व स्काऊट्स आणि गाईड्स या नेशनल कॅम्पमध्ये स्काऊट मास्टर शेखऱ कोलते यांच्या मार्गदर्शनात सहभागी होत आहेत .
या नेशनल एडवेंचर कॅम्पमध्ये सहभागी होणारे सर्व स्काऊट्स आणि गाईड्स यांना नागपुर जिल्हा भारत स्काऊट्स आणि गाईड्स कार्यालयचें जिल्हा संघटक सत्यशील पाटिल, जिल्हा संघटक मंजूषा जाधव, पारशिवनीचें तहसीलदार सांगडे, गट शिक्षणाधिकारी वंदना हटवार, केंद्र प्रमुख कैलाश लोखंडे, हरिहर कनिष्ठ महाविद्यालयचे मुख्याध्यापक वानखेड़े यांनी शुभेछ्या दिल्या.