19 गोवंश जनावरांना नवीन कामठी पोलिसांनी दिले जीवनदान

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव वळण मार्गावरील पाटील ढाब्यासमोरून एका कंटेनर ने अवैधरित्या गोवंश जनावरे वाहून नेत असता नवीन कामठी पोलिसांनी सदर कंटेनर वर धाड घालून कत्तलीसाठी वाहून नेत असलेल्या गोवंश जनावरांना ताब्यात घेत भंडारा येथील खैरीच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जिवनदान दिल्याची यशस्वी कारवाही आज पहाटे चार वाजता केली असून या धाडीतून चार आरोपीना ताब्यात घेत 19 गोवंश जनावरे किमती 4 लक्ष 75 हजार रुपये व जप्त कंटेनर ट्रक किमती 20 लक्ष रुपये असा एकूण 24 लक्ष 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या कारवाहितुन ताब्यात घेतलेल्या चार आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीमध्ये फिरोज खान रशीद खान ,वासुदेव सुर्वे,आदर्श लांभाडे व एक अल्पवयीन आरोपी सर्व रा सेलू जिल्हा वाशीम चा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळ मार्गे गोवंश जनावरांची अवैधरित्या वाहतूक होत असलेल्या ट्रक कंटेनर क्र एम एच 37 पी 5799 वर नवीन कामठी पोलिसांनी धाड घालून चार आरोपीना ताब्यात घेत 19 गोवंश जनावरे ताब्यात घेत गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान देण्यात आले.या कारवाहितुन 24 लक्ष 75 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त,एसीपी नलावडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोरे, पोलीस उपनिरीक्षक पवार आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कृषीपूरक अभ्यासक्रम सुरु करण्यास प्राधान्य द्यावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Fri May 26 , 2023
रत्नागिरी :- महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखकारक करण्यास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. शासकीय तंत्रनिकेतन परिसरात कौशल्य विकास केंद्रामार्फत सुमारे 20 विविध अभ्यासक्रम राबविले जातात. कृषी पूरक अभ्यासक्रम सुरु करण्याला या केंद्राने प्राधान्य द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या परिसरात निर्माण करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्राचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!