खापरखेडा:- अंतर्गत ०३ किमी अंतरावर मौजा भानेगाव येथे दिनांक २१/०५/२०२३ चे ११/३० वा. ते १२/१० वा. दरम्यान पोलीस स्टेशन खापरखेडा येथील स्टाफ हा पोलीस स्टेशन खापरखेडा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, मौजा भानेगाव येथुन रेतीची चोरटी वाहतुक ट्रकने होत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून मौजा भानेगाव येथे नमुद आरोपी नामे वसंता संभाजी गायकवाड, वय ५३ वर्ष, रा. वार्ड क्र. ०६ सिध्दार्थ नगर महादुला कोराडी. ता. कामठी याने आपले ताब्यातील टाटा कंपनीची ६ चक्का ट्रक क्र. एम.एच. ३१. सी. क्यू. ९४९७ मध्ये विना परवाना (रॉयल्टी) रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्याचे ताब्यातून १) २ ब्रास रेती प्रत्येकी किमती अंदाजे ४,०००/- प्रमाणे एकुण अंदाजे किंमती ८,०००/-रु. २) टाटा कंपनीची ६ चक्का ट्रक क्र. एम. एच. ३१. सी. क्यु- ९४९७ अंदाजे किंमती ५,००,०००/-रू असा एकुण ५,०८,०००/-रूपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी स्तर तर्फे फिर्यादी नामे पो.ना. राजु विश्वनाथ भोयर रा. पो.स्टे. खापरखेडा यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन खापरखेडा येथे आरोपीविरुद्ध कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.
गुन्हयाचा पुढील तपास स.फौ. कैलास पवार, पोस्टे खापरखेडा, हे करीत आहे.