ऑनलाईन फसवणुकीत १०४७८५ /- रूपये थांबविण्यात नागपूर ग्रामीण सायबर पोलीस स्टेशनला यश

 नागपूर :- फिर्यादी यांना नागपूर ते दिल्ली व दिल्ली ते नागपूर अशी फ्लाईट बुक करायची होती म्हणून ऑनलाईन गुगलवर सर्च करून त्यासंबंधित एक पेज ओपण झाला असता, त्यात माहिती भरली. त्यामुळे फिर्यादी यांचे अकाउंट मधुन २०४७८५/- रू. डेविट झाले. दिनांक १७/०५/२०२३ रोजी सायबर टिम हि कळमेश्वर हददीत जनजागृती कार्यक्रम घेणे कामी गेले असता तक्रारदार यांनी त्यांचे सोबत झालेली हकीकत सांगीतली तेव्हा सायबर टिम यांनी तात्काळ दखल घेत कार्यवाही करून तक्रारदार यांचे पैसे परत करण्यात सायबर पोलीस स्टेशनला यश आले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद,अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले तसेच सायबर पोलीस स्टेशन येथील पोलीस उप निरीक्षक निशांत जुनोनकर, पोलीस उपनिरीक्षक भारत विटे तसेच महिला पोलीस हवालदार स्नेहलता ढवळे, पोलीस नायक वर्षा खंडाईत, संगीता गावंडे, संतीश राठोड, पोलीस शिपाई मृणाल राऊत महिला पोलीस शिपाई वैष्णवी पवार यांनी पार पाडली. सर्व जनतेला आव्हान करण्यात येते की, अशा प्रकारच्या ऑनलाईन फ्रॉडला बळी पडु नये.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नांदगाव, बखारी व वराडा, एसंबा गावकरी शेतक-यांना प्रदुर्शन मुक्ती करिता लढा लढणार - आदित्य ठाकरे

Tue May 23 , 2023
मोतीराम व्ही रहाटे, प्रतिनिधी  कन्हान :- नांदगाव-बखारी येथील बंद राख तलावाच्या जागेवर सौलर उर्जा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देऊन व वराडा, एसंबा येथील कोल वॉसरीच्या कोळसा धुळीने त्रस्त गावकरी शेतक-यांना प्रदुषनापासुन मुक्त करेपर्यंत लढा लढणार.सोमवार (दि २२) मे ला सायंकाळी ४.३० वाजता युवासेना प्रमुख व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हयानी नांदगाव ला भेट देऊन नांदगाव, बखारीच्या गावक-याशी सुसंवाद साधुन राखेच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!