संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराचा उपचार घेत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची दुचाकी क्र एम एच 40 बी एम 8291 किमती 40 हजार रुपये ची दुचाकी दवाखान्या समोरून चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली असून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.