जनावर वाहतूकीचा ट्रक पळविणाऱ्या टोळी गजाआड ; एकूण ८,४०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त.

– दिनेश दमाहे 

स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची कारवाई  

नागपूर/ सावनेर – पोलीस स्टेशन सावनेर नागपूर ग्रामीण च्या हद्दीत दिनांक ११ एप्रिल २०२३ रोजी सकाळीच्या सुमारास काही अनोळखी इसमें चार चाकी वाहनातून येऊन सावनेर मोहपा बायपास रोडवर एक आयसर गाडी क्र. MH 40 CM 0519  जनावराची वाहतूक होत असताना सदरच्या वाहनास थांबवून वाहन चालकास  खाली उतरवून जनावरांनी भरून असलेला ट्रक जबरीने पळवून नेला अशा ट्रक मालकाच्या फिर्यादी वरून पोलीस स्टेशन सावनेर येथे अपराध क्रमांक २९६ / २३ कलम ३४९, ३९२ भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा नागपूरच्या वतीने करण्यात येत होता. आज दिनांक ३ मे २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपास करीत असताना गोपनीय खबर प्राप्त झाली की नमूद गुन्हातील चोरीस गेलेला आयसर गाडी क्र. MH 40 CM 0519 के वाहन छिंदवाडा रोडने सावनेरच्या दिशेने येत असल्याचे माहिती मिळाली सदर माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचून ट्रक चालकास ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अन्सार उर्फ इमरान खान ऊर्फ इमरन खान वय ३० वर्ष राहणार बढेगाव तालुका अमरवाड़ा जिल्हा छिंदवाड़ा मध्य प्रदेश असे सांगितले त्याच्या ताब्यातील ट्रक हा पोलीस स्टेशन सावनेर येथील जबरी गुन्ह्यातील चोरीस गेलेला ट्रक असल्याने त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी नामे अन्सार ऊर्फ इमरान खान यांनी त्याच्या इतर तीन साथीदारासह गुन्हा केल्याचे मान्य केले सदर आरोपीतांनी नमुद गुन्हा हा त्यांनी गुन्हा आर्थिक विवंचनेतून केल्याचे सांगून ट्रक मधील जनावर हे त्याच्या इतर साथीदारांनी नागपुर येथे विकल्याने सांगितले नमूद आरोपी नामे अनुसार ऊर्फ इमरान खान याच्या ताब्यातून चोरीस गेलेला ट्रक आयसर गाडी क्र. MH 40 CM 0519 किमती अंदाजे ८.००,०००/- रुपये व नगदी ४०,०००/- रुपये असा एकूण ८,४०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून पुढील कायदेशीर कारवाई करीता पोलीस स्टेशन सावनेर यांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच उर्वरीत आरोपीताचा शोध सुरू आहे. नमूद गुन्ह्यात पकड़ण्यात आलेला आरोपी नामे अन्सार उर्फ इम्रान खान वल्द अशरफ खान, वय ३० वर्ष, राहणार मु. बळेगाव ता. अमरवाडा जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश हा छिंदवाडा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळया कलमाखालील एकूण १० यामध्ये मागील काही वर्षापासून फरार असून मध्यप्रदेश पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु त्यांना मिळून आला नाही स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणच्या पथकाने विशेष प्रयत्न करून सदर आरोपीस पकडले.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक  विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजीव कर्मलवार, आशिषसिंग ठाकुर,पोहवा राजेंद्र रेवतकर, नागोशी आशिष मुगले, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल यांच्या पथकाने पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पोलीस पित्याचा रेल्वे अपघाती मृत्यु.

Thu May 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 4 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यादवनगर रहिवासी व पोलीसपदी नोकरीवर असलेल्या पोलीस पित्याचा रमानगर रेल्वे क्रॉसिंग मार्गावरील तारा माता मंदिर जवळ रेल्वे गाडीच्या धक्क्याने जागीच अपघाती मृत्यु झाल्याची घटना गतसायंकाळी 5 दरम्यान घडली असून मृतक पोलीस पित्याचे नाव शिवलाल मिठठूलाल यादव वय 61 वर्षे रा यादव नगर कामठी असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com