संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27 :- नागपूर जिल्ह्याचे उनगर मानले जाणारे कामठी शहराची जगप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल मुळे जगाच्या नकाशात नोंद करण्यात आली आहे.तसेच येथील सैन्य केंद्रामुळे कामठी शहराचे महत्व मोठे आहे तर कामठी शहराची ओळख ही आणखी सर्वदूर व्हावी या हेतूने कामठी नगर पालिकेने लाखो रुपये खर्च करून शहरातील मध्य भाग असलेल्या जयस्तंभ चौकात ‘I LOVE KAMPTEE”चे स्ट्रेचर लावून कामठी शहरावीषयी प्रेम निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहे.तर ही नवीन नामावली शहरात चर्चेचा विषय ठरला असून तरुण पिढी या नामावली समोर उभे राहून सेल्फी काढताना दिसतात तर सायंकाळ होताच प्रकाशमय वातावरणात लखलखत्या प्रकाशझोतात ही नामावली आकर्षित ठरत असल्याने बऱ्याच लोकांना या नामावली समोर उभे राहून सेल्फी काढण्याचा मोह आवरता येत नाही.त्यातून आम्ही कामठीवासी ,कामठी शहरावर आमचे खूप प्रेम आहे असे दर्शवित उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करतात.
कामठी शहरातील सैन्य केंद्र, विश्वप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पल ,आदीमुळे प्रसिद्ध पावलेल्या कामठी शहराची ओळख आणखी सर्वदूर होऊन शहरवासीयांच्या मनात कायम असावी यासाठी कामठी शहरातून जाणाऱ्या नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कामठी शहराच्या मध्यभागी असलेल्या जतस्तंभ चौकाच्या कडेला असलेल्या जयस्तंभ च्या बाजूला सौदर्यीकरणातून कामठी नगर परिषद ला प्राप्त होणाऱ्या निधींतुन खर्चाची तरतूद करून ‘आय लव्ह कामठी’ असे नामावलीचे स्ट्रेचर लावण्यात आले आहे हे अतिशय आकर्षक ठरत असून शहराविषयी प्रेम असल्याचे कृतज्ञता व्यक्त होते तर या नामावली च्या बाजूलाच असलेले बस स्थानाकावर थांबलेली विद्यार्थिवर्ग तसेच तरुण मंडळी मोबाईल ने या नामावली समोर उभे राहून सेल्फी काढत आनंदोत्सव साजरा करताना दिसतात .हे आकर्षक दिसणारे आय लव्ह कामठी नामावली चे स्ट्रेचर कामठी शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
जयस्तंभ चौकातील ‘I LOVE KAMPTEE’ची नामावली चर्चेत..
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com