संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कायद्याचे राज्य निर्माण व्हावे व नागरिकांना तडकाफडकी पोलिस सेवा मिळावी यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष उभारले आहेत ज्यामुळे नागरिकांना वेळीच पोलीस सेवा मिळत असल्याने कित्येक गुन्ह्यावर आळा बसविण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले आहे तर कायद्याचे रक्षक म्हणून कर्तव्यदक्ष भूमिका बजावणाऱ्या खाकी वर्दी परिधान केलेल्या पोलिसांनाच जर आरोपीताकडून मारहानी सारखे वर्तन होत असतील तर रक्षणाच्या हितासाठी हाक मारणाऱ्या पीडितांनी हाक मारावी कुणाला?असा प्रश्न काल मध्यरात्री जुनी कामठी पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या घटनेतून उपस्थित होतो.तर काल जुनी कामठी पोलीस ठाण्यातच गदारोळ माजविनाऱ्या दोन आरोपीनी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या अंगावर धावून जात,त्यांची कॉलर पकडून अश्लील शिवीगाळ देत जीवे मारण्याची धमकी दिली दरम्यान पोलिस व आरोपीत जुंपलेली ही फ्री स्टाईल चांगलाच चर्चेचा विषय ठरला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील दाल ओली नं 2 रहिवासी योगेश गुप्ता यांच्या घरावर काल मध्यरात्री दीड दरम्यान आरोपी तापसकुमार शर्मा व शुभम सोंनकुसरे या दोघांनी घरावर हल्ला चढवीत कुठलेही कारण नसताना अश्लील शिवीगाळ देऊन जीवे मारण्याची धमकी देत मारझोड करणे सुरू केले दरम्यान आपला जीव वाचविण्याच्या उद्देशाने योगेश गुप्ता हे घरासमोरील शेजारील राकेश गुप्ता यांच्या घरी धावून गेले असता आरोपितांनी संगनमत करून यांच्याही घरात शिरून आरसा ,मोबाईल फोडून मारझोड केली यावेळी मदतीची धाव घेत पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार जुनी कामठी पोलीस स्टेशन चे बिट मार्शल हे वेळेवरच पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली व अनुचित घटना टळली .या घटनेत फिर्यादी योगेश गुप्तां ने स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून सदर दोन्ही आरोपी तापसकुमार शर्मा व शुभम सोंनकुसरे दोन्ही राहणार नागपूर विरुद्ध भादवी कलम 452,323,294,504,506,34 अनव्ये गुन्हा दाखल केला. याचप्रसंगी सदर दोन्ही आरोपीना जुनी कामठी पोलिस स्टेशन ला आणले असता या आरोपीने पोलीस स्टेशन ला गदारोळ माजविणे सुरू केले.यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस नाईक फैजूर रहमान मैफुज्जूर राहमान च्या अंगावर धावून जात ,त्यांच्या खाकी वर्दीच्या शासकीय गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केली इतकेच नव्हे तर’ तुम मेरे बारे मे जाणते नही हो,तुम सब की वर्दी उतरवाऊंगा अशी आरडाओरड करून पोलिसाच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला.यासंदर्भात फिर्यादी पोलीस नाईक फैजूर रहमान मैफुज्जूर रहमान वय 42 वर्षे ने दिलेल्या तक्रारीवरून सदर दोन्ही आरोपी तापसकुमार शर्मा वय 37 वर्षे रा गोधणी नागपूर तसेच शुभम सोंनकुसरे वय 26 वर्षे रा पाचपावली नागपूर विरुद्ध भादवी कलम 353,294,504,506,323,34,85 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.