नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांद्वारे महापंडित राहुल सांस्कृत्यायन सभागृहात विभाग प्रमुख डॉ नीरज बोधी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले यांची 196 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी याच विभागातील 2022 च्या बॅचची ऋचा भानुदास जीवने हिला पालीत चार सुवर्ण पदके मिळाल्याने विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने ऋचाला महात्मा फुले गौरवग्रंथ व फोटो देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी डॉ नीरज बोधी यांनी विद्यार्थ्याने व समाजातील कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी वस्त्या-वस्त्यात व विहारा- विहारात जाऊन बुद्ध वचनाची भाषा असलेल्या पालीच्या प्रमोशनसाठी व महापुरुषांच्या विचार धारेसाठी अहोरात्र कार्य करावे असे आवाहन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यातून हर्षवर्धन जिभे, एड दिलीप अंबादे, चंदा लाडे तर प्राध्यापक वर्गातून डॉ तुळसा डोंगरे, प्रा सरोज वाणी आदींनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रा डॉ ज्वाला डोहाने, प्रा डॉ सुजित वनकर-बोधी, प्रा रोमा शिंगाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उत्तम शेवडे यांनी तर समापन प्रा डॉ रेखा बडोले यांनी केले.