संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नागपूर वनामती येथील प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी (गट विकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी), यांनी नुकतेच कामठी तालुक्यातील प्रगतिशील गावात समावेशक असलेल्या ग्रामपंचायत कापसी बु., कढोली व महालगाव या तीन गावाला क्षेत्रभेट दिली.
या क्षेत्रभेटीत सदर अधिकाऱ्यांनी कढोली गावाला भेट दिली असता गावाला उंच शिखरापर्यंत नेऊन गावाचे नावलौलीक करनारे व गावात विकासकामांचा फेरा वाढवून गावात विविध सोयीसुविधा करीत गावाचा कायापालट करणाऱ्या माजी सरपंच प्रांजल वाघ यांनी गावातील विविध योजनेअंतर्गत झालेल्या विकासकामांची माहिती देत योग्य ते मौलिक मार्गदर्शन केले .यावेळी क्षेत्रभेटीत उपस्थित अधिकाऱ्यांना तिनही ग्रामपंचायत मधील विविध योजनाची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात आली. तसेच या तिन्ही ग्रामपंचायतमध्ये विविध योजना अंतर्गत झालेल्या वर्मी कंपोस्ट प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन बाबत कामे, डिजिटल अंगणवाडी, नरेगा अंतर्गत कामे, मोक्षधाम, रुर्बन अंतर्गत कामे, व इतर कामानां भेटी दिल्यात. तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विविध योजनाची माहिती देण्यात आली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले,कढोली ग्रा प च्या माजी सरपंच प्रांजल वाघ, विद्यमान सरपंच लक्ष्मण करारे ,उपसरपंच महेश कुपाले,ग्रा प सदस्य राकेश गावंडे,मीनाक्षी ठाकरे, गोविंदा ठाकरे,बबन वानखेडे, आरती घुले,इंदिरा रंगारी, छाया ढोके,संगीता चौधरी,तंटामुक्त अध्यक्ष अरुण शहाणे,माजी तंटामुक्त अध्यक्ष शंकर घुले,भारत महल्ले,साबळे,वसंत वराडे, राजेश वाघ,विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे,ग्रामसेवक ब्रह्मानंद खडसे,सचिन ठाकरे आदींनी उपस्थिती दर्शविली होती.तसेच कापसी बु व महालगाव ग्रा प प्रशासनातर्फेही गावाची विशेष माहिती देण्यात आली.