-ग्राहकांची आपली फसवणूक होऊ नये याकरिता काळजी घेण्याचे आवाहन तहसिलदार बाळासाहेब मस्के यांनी केले.
-ग्राहकांनी आजच्या युगात खरेदी करताना सावध होऊन खरेदी करावी – विदर्भ प्रांत अध्यक्ष ॲड. स्मिता देशपांडे
रामटेक :- अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेक ची नवीन कार्यकारणी घोषित झाली.त्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेक चे अध्यक्ष म्हणून राकेश मर्जिवे यांची नियुक्ती करण्यात आली.उपाध्यक्ष अविनाश शेंडे , सचिव प्रशांत येडके , प्रसिद्धी प्रमुख देवानंद कामठे , तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेकच्या युवा महिला अध्यक्षपदी शितल चिंचोळकर , कार्याध्यक्ष पदी सुषमा मर्जिवे
यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष जयश्री मर्जिवे , सचिव चांदणी कश्यप ,महासचिव दामिनी जोशी , सह सचिव पल्लवी गजभिये , कोषाध्यक्ष नंदिनी राऊत , प्रसिध्दी प्रमुख अंशुजा तांदुळकर , संघटन मंत्री आशीका चव्हाण , सह संघटन मंत्री आचल लबडे , तर प्रमुख मार्गदर्शक पदी ॲड.ऋतुजा कुलकर्णी,प्रकाश भूजाडे, यांची निवड करण्यात आली….
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली , ग्राहक पंचायत च्या विदर्भ प्रांत अध्यक्ष ॲड स्मिता देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्राहकांनी आजच्या युगात खरेदी करताना सावध होऊन खरेदी करावी तसेच ग्राहक पंचायत बद्दल मार्गदर्शन केले…
कार्यक्रमाचे उद्घाटक तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी ग्राहकांची फसवणूक होऊ नये तसेच ऑनलाईन खरेदी करताना घ्यावयाची काळजी या बद्दल सांगितले. ॲड ऋतुजा कुलकर्णी यांनी ग्राहकांची होणारी फसवणूक या बाबत यथोचित मार्गदर्शन केले….
नागपूर जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे यांनी ग्राहकाने दुकानातून कोणतीही वस्तू घेताना बिल घ्यावे तसेच कोणताही व्यवहार करताना फसगत होणार याकरिता चाणक्ष बुध्दी ठेवणे आज काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमात तहसीलदार बाळासाहेब मस्के , पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे,अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा विदर्भ प्रांत अध्यक्ष स्मिता देशपांडे ,विदर्भ प्रांत उपाध्यक्ष संध्या पूनयानी , नागपूर जिल्हा संघटन मंत्री गणेश शिरोळे ,जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रकाश भुजाडे , ॲड मनीष शुक्ला , ॲड पुनम पांडे, ॲड ऋतुजा कुलकर्णी , एड.शुक्ला मैडम, पी.टी रघुवंशी , डॉ रामसिंग सहारे, डॉ.नितीन वेरुळकर, भारतीय स्टेट बँक चे चीफ मॅनेजर निनावे,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव जिवतोडे,लक्ष्मण मेहर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे नवनियुक्त युवा महिला अध्यक्ष शीतल चिंचोलकर यांनी केले. प्रास्ताविक अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे सचिव प्रशांत येडके यांनी केले तर आभार अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे अध्यक्ष राकेश मर्जीवे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेक चे पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले .