संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-स्टार बस व ई बस च्या प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागाच नाही
-कामठी बस स्थानक चौकात रोड रोमियोची मनमानी
कामठी :- प्रवाशांना स्वस्त व सुलभ प्रवास घडावा म्हणून शहर बस सेवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे तर या प्रवाशांच्या भरवश्यावर स्टार बस प्रशासन आपली तिजोरी भरत आहे तसेच आता नुकतेच वातानुकूलित ई बस सेवा सुरू करण्यात आली मात्र कामठीच्या स्टार बस थांबा होणाऱ्या ठिकाणी अधिकृत बस स्थानक नसल्याने स्टार बस रस्त्यावर उभे करावे लागत असल्याने स्टार बसच्या बसस्थानका अभावी प्रवासी सुविधा ही वाऱ्यावर दिसूनच येत आहे.
कामठी शहरात स्टार बस सेवेचा शुभारंभ होऊन 5 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असला तरी या स्टार बस च्या थांब्यासाठी अजूनपावेतो अधिकृत बस स्थानक ची सोय झाली नसल्याची ही एक शोकांतिकाच मानावी लागेल परिणामी स्टार बस प्रवासी सुविधा ही वाऱ्यावर दिसून येत असून स्टार बस च्या प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा सुदधा नाही.
कामठी बस स्थानक चौकात स्टार बस ह्या रस्त्यावर उभ्या राहत असून मागील कित्येक वर्षांपासून स्टार बसच्या बस स्थानका अभावी बस सुविधा तसेच प्रवासी हे वाऱ्यावर आहेत त्यातच स्टार बसच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणी तसेच शालेय व महाविद्यालयीन तरुणींचो कामठी बस स्थानक चौकात रोडरोमियो कडून सर्रास टवाळखोरी करणे सुरू आहे.
दोन लक्ष लोकसंख्येच्या घरात असलेल्या तालुकादर्जा प्राप्त कामठी शहरातील व आसपासच्या गावातील अनेक नागरिक नोकरी,कामधंदा, शिक्षण या कामासाठी हजारोच्या संख्येने नागपूर कडे ये जा करतात . अनेक जण रेल्वे , एस टी , स्टार बस व ऑटो किंवा आपल्या स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी च्या संपामुळे स्टार बस चा प्रवासांनी स्टार बस कडे कल वाढवला आहे.काही वर्षांपूर्वी कामठी शहरातून एस टी महामंडळाची शहर बस सेवा बंद करून त्याजागी स्टार बस सेवा सुरू झाली. प्रारंभी या सेवेचे नागरिकांना अप्रूप वाटत होते.चमकनाऱ्या , आकर्षक लाल रंगाच्या , आकर्षक लाल रंगाच्या , आकर्षक आसन व्यवस्था, संगणकीय तिकीट व्यवस्था यामुळे बस चे सर्वांना आकर्षण होते.नागरिकांनी सुद्धा सेवेला उदंड प्रतिसाद दिला.सध्यस्थीतीत कामठी तालुक्यात 20 च्या जवळपास स्टार बस धावत आहेत.ह्या स्टार बस शहरासह ग्रामीण भागातही जात असल्याने प्रवासानी स्टार बस कडे आपले लक्ष वेधले आहे.नुकतेच शाळा महाविद्यालये सुरू झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्ग या अनधिकृत स्टार बस थांब्याजबळ येऊन स्टार बस च्या प्रतीक्षेत असतात मात्र या उभ्या असलेल्या महिला तसेच विद्यार्थी वर्ग तरुणींना काही टवाळखोर टवाळखोरी करीत आहेत.बस ची वाट बघत असलेल्या प्रवासासाठी पिण्याचे पाणी तसेच लघुशंकेची कुठलीही सोय नाही परिणामी प्रवाशिंचो मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे.मात्र स्टार बस व्यवस्थापणाने प्रवासी सोयी सुविधेकडे कधीच लक्ष पुरविले नाही.
आजही तालुक्यातील हजारो नागरिक स्टार बस ने प्रवास करीत आहेत .कामठी शहरात येणाऱ्या स्टार बस साठी स्थायो बस स्थानक नाही, परिणामी रेल्वे स्टेशन रोड वर एस टी स्थानक चौकात या स्टार बसेस रस्त्याच्या कडेला उभे असतात, स्टार बस चे कुठलेही वेळापत्रक नाही, केव्हा कुठली बस येईल व केव्हा जाईल याची माहिती देण्याची कुठलीही व्यवस्था नाहो.येथे स्टारबस चा कुठलाही अधिकारी नाहो.या सर्व असुविधेमुळे स्टार बस ने प्रवास करणाऱ्या प्रवासाची गैरसोय होत आहे तेव्हा स्टार बस व्यवस्थापकोय मंडळाने या गैरसोयी लक्षात घेता सुव्यवस्था करीत स्टार बस चे स्थायी बस स्थानक लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे.