संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी चौकातील श्री बालाजी दोसा सेंटर मध्ये नाश्ता कारायला गेलेल्या 14 वर्षीय स्वरूप खांडेकरची लाल रंगाची हिरो सायकल चोरीस गेल्याची घटना 9 फेब्रुवारीला सायंकाळी 5 दरम्यान घडली असता फिर्यादी त्रिशला प्रमोद खांडेकर राजे पी नगर कामठी ने स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुध्द भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल करीत तपासाला गती देत आरोपीचा शोध घेतला असता या चोरट्याचा शोध लावण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले असून अटक आरोपीचे नाव सुनील ब्राह्मणकर वय 52 वर्षे रा बिनाकी ,भैरव मंदिर जवळ ,यशोधरा नगर नागपूर असे आहे.आरोपीकडून चोरीस केलेल्या पाच सायकल हस्तगत करण्यात आल्या.
ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस अधिकारी जितेंद्र ठाकूर,पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने,डी बी स्कॉडचे दिलीप ढगे,श्रीकांत विष्णुरकर, धर्मेंद्र राऊत,अंकुश गजभिये यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.