संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधी नगर मार्गे अवैधरित्या योद्धा पिकअप वाहनाने गोवंश जनावरांची वाहतूक करीत असता रात्रगस्तीवर असलेल्या जुनी कामठी पोलिसांनी वेळीच वाहनाचा पाठलाग करून सदर वाहनावर धाड घालून वाहन जप्त करीत दोन आरोपीना ताब्यात घेत 8 गोवंश जनावरे पारडी नागपूरच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून कत्तलीसाठी जाणाऱ्या 8 गोवंश जनावरांना जीवनदान दिल्याची यशस्वी कारवाही गतरात्री साडे नऊ दरम्यान केली असून या धाडीतुन 8 गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 15 हजार रुपये व योद्धा पिकअप वाहन-क्र एम एच 40 सी डी 3629 किमती 4 लक्ष रुपये असा एकूण 5 लक्ष 15 हजार रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक दोन आरोपीमध्ये शहनवाज खान रहमान खान वय 23 वर्षे रा. नया गोदाम कामठी,अयान खान हातीम खान वय 26 वर्षे रा. न्यू येरखेडा कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डीसीपी श्रवण दत्त,एसीपी नलावडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे ,पोलीस उपनिरीक्षक राजेश दुबाले,डी बी पथकाचे दिलीप ढगे,अंकुश गजभिये,श्रीकांत भिष्णुरकर,प्रमोल शेळके,इशांत कांबळे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.