संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज (30 जानेवारी) 75 व्या पुण्यतिथी निमित्त कांग्रेस तर्फे कामठी नगर कांग्रेस कमिटी कार्यालयात सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक रतनलाल पहाडी यांनी सांगितले की राष्ट्रपिता महात्मा गांधी वर्ध्यातील सेवाग्राममध्ये अनेक वर्षे राहिले. येथील ‘बापू कुटी आश्रम’ हा देशातील एकमेव असा आश्रम आहे जेथे बापूजींच्या अनेक वस्तू जशाच्या तशा आहेत. म्हणजेच अनेक वर्षापूर्वी आपल्याला सोडून गेल्यानंतरही त्या वस्तू नीटनेटक्या स्थितीत तशाच आहेत.तसेच स्वातंत्र्य सैनिक रतनलाल पहाडी यांनी कव्य पाठ सुदधा वाचले.
याप्रसंगी नगर कांग्रेस कामेटी अध्यक्ष कृष्णा यादव, कार्यअध्यक्ष आबिदभाई ताजी ,माहिल अध्यक्ष सुरया बाजी , जिला परिषद सभापति अवंतिका लेकुरवाडे, माजी नगर अध्यक्ष निरज यादव, माजी नगरअध्यक्ष प्रमोद मानटवकर, अहफाज अहमद ,रमेश दुबे, तुषार दावानी ,पराग वाड़ई ,अरिफ कुरैशी, मनोज यादव, कुसुम जामल अंसारी, हर्षद खडसे ,उबेद सईद अफरोज ,सूशांत यादव, मातम कामळै , सोहेल अंजूम, समस्त कांग्रेस कार्यकर्ता उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नितेश यादव यांनी केले.