आयआयएमसी तर्फे ६ जानेवारी रोजी ‘संपादक संवाद’ कार्यक्रम

मार्गदर्शन : महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी, संपादक श्रीमंत माने व संपादक गजानन निमदेव

अमरावती :- भारतीय जनसंचार संस्थान तर्फे मराठी पत्रकारिता दिनानिमित्य ‘संपादक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थानचे महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी (दिल्ली) यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथील दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने आणि दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव हे विद्यार्थाना ‘मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरूप’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

भारतीय जनसंचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्राच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता मराठी पत्रकारिता दिनानिमित्य ‘संपादक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात होणार आहे. याप्रसंगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. विजयकुमार चौबे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनसंचार संस्थानचे पश्चिम क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती राहणार आहे. यावेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख आणि मराठी व हिंदी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. मोना चिमोटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन देखील लावण्यात येणार आहे.

‘संपादक संवाद’ हा उपक्रम मराठी पत्रकारिता दिनाचे औचित्य साधून सुरु करण्यात आला आहे. मराठीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण या नावाने मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले होते. त्यांचा कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्रात दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारिता दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्याने भारतीय जनसंचार संस्थानच्या अमरावती केंद्राच्या वतीने मराठी पत्रकार दिनी ‘संपादक संवाद’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमा अंतर्गत महाराष्ट्रातील विविध प्रसारमाध्यमाचे संपादक विद्यार्थ्यांशी वेळोवेळी संवाद साधणार आहेत.

या कार्यक्रमाचा विद्यार्थी, शिक्षक, पत्रकार तसेच इच्छुकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनसंचार संस्थानचे पश्चिम क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती यांच्या सह प्रा. अनिल जाधव, डॉ. राजेश कुशवाहा, डॉ विनोद निताळे, डॉ आशिष दुबे, संजय पाखोडे आदींनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहिर जगण विकणा-या माणसांच्या कविता,धगधगते तळघर,रानजुई,नवरत्न, वळणवाटा,इलेक्शन बिलेक्शन चा समावेश

Wed Jan 4 , 2023
अहमदनगर : शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने २०२१ चे “ राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार ” जगण विकणा-या माणसांच्या कविता,धगधगते तळघर,रानजुई, नव रत्न, वळण वाटा, इलेक्शन बिलेक्शन या पुस्तकांना जाहिर करण्यात येत असून पंधराव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामध्ये पुरस्कार वितरण होणार आहे.अशी माहिती शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली. पुरोगामी विचारांच्या व विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणा-या शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com