चंद्रपूर :-चंद्रपूर मनपा झोन क्र.1 मधील नागीनाबाग प्रभागात दाताळा रस्ता (वैष्णवी अपार्मेंट समोरून) ते ओंकार नगर रस्त्याचे नाली बांधकाम करीत असतांना 60 फूटाच्या रस्त्याला नाली बांधकाम करतांना 45 फूटावर करण्यात आलेले आहे. उर्वरित 15 फूट जागा अंधभक्त प्लाट धारकांना अतिक्रमण करण्यासाठी सोडण्यात आली. सोबतच नालीचा उतार नाल्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने करण्यात येत असल्यामुळे पुराचा फटका बसण्याची दाट शक्यता असल्यामुळे वृक्षाईचे कुशाब कायरकर यांनी मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री, सा.बा.मंत्री, सोबतच त्या त्या विभागाच्या प्रधान सचिव, जिल्हाधिकारी, अधिक्षक अभियंता चंद्रपूर यांना दि.24.नोव्हेंबर 2022 ला पत्र पाठवून चौकशी करण्याची मागणी केलीअसता आयुक्त मनपा यांनी दि.07 डिसेंबर 2022 ला हे बांधकाम सा.बा. विभाग चंद्रपूर 2 करीत असल्याचे कळविले.
परंतु आज पर्यंत कोणतेही अभियंता-अधिकारी मोक्का चौकशी करण्यासाठी आले नाही त्यामुळे व्यतिथ होऊन पुन्हा संबंधितांना दि.18.12.2022 रोजी प्रथम स्मरण पत्र पाठविण्यात आले.
भारत व जगातील महानगर पालिका वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अरुंद रस्ते मोठे करते या उलट 60 फूट रुंद रस्त्याला ठेकेदार 25 ते 45 फूट करीत असतांना व ते लक्षात आणून दिल्या नंतरही प्रशासन मौन राहते तेव्हा “भ्रष्ट नेते-अधिकारी-ठेकेदार राज “मुळे भ्रष्टाचार चा विकास व 4 पट (400%)मालमत्ता कर व सकाळी उठल्या पासून मंजन-अन्यधान्य पासून प्रत्येक वस्तुवर GST च्या, व्यवसाय व आयकर रूपाने कर भरणारा चंद्रपूरकर व चंद्रपूर भिकार झाल्याची प्रचिती मागील 8-9 वर्षा पासून जनतेला येत आहे. समस्त चंद्रपूरकर व आम्ही जनतेचे कैवारी असल्याचे आव आणणाऱ्या सर्व विरोधी राजकीय पक्ष,सामाजिक संघटनांनी अश्या “भ्रष्ट नेते-अधिकारी-ठेकेदार राज”ला समाप्त करण्यासाठी व लगतच्या वर्धा, यवतमाळ सारखे मोठे, प्रशस्त रस्ते, वाहतूक कोंडी-प्रदूषण-पूर-पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी एकजूट होऊन विरोध करण्याचे आव्हान इरई बचाव जणांदोलनाचे संयोजक व वृक्षाईचे संस्थापक कुशाब कायरकर यांनी केले आहे.