संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोदी पडाव कडून शास्त्री मंच कडे भरधाव वेगाने गोवंश जनावरांची पीकअप वाहनाने अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड घालण्यात जुनी कामठी पोलिसांना यशप्राप्त झाल्याची कारवाही गतरात्री 10 दरम्यान केली असून या धाडीतून पिकअप वाहनात कोंबून असलेले 9 गोवंश जनावरांना ताब्यात घेत नजीकच्या गोरक्षण शाळेत सुरक्षित हलवून जीवनदान दिल्याची भूमिका साकारली.या कारवाहितुन 9 गोवंश जनावरे किमती 1 लक्ष 35 हजार रुपये,पिकअप वाहन किमती 4 लक्ष रुपये,निळ्या पिवळ्या रंगाच्या रस्या असा एकूण 5 लक्ष 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत पसार वाहनचालक व वाहनमालक विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटनास्थळ मार्गे पोलीस गस्तीवर असताना त्या मार्गाने एक पिकअप वाहन क्र एम एच 35 के 4716 भरधाव वेगाने येत असल्याचे दिसताच पोलिसांनी सदर वाहन थांबवले असता आरोपी वाहन चालकाने घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले.पोलिसानी सदर वाहन ताब्यात घेत वाहणात कोंबून असलेले 9 गोवंश जनावरे गोरक्षण शाळेत सुरक्षित हलविण्यात आले तर या कारवाहितुन 5 लक्ष 35 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही परिमंडळ क्र 5 चे पोलीस उपायुक्त श्रावनकुमार दत्त,एसीपी नलवाड यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भीताडे,पोलीस उपनिरीक्षक केरबा उर्फ आकाश माकने, डी बी पथकाचे दिलीप ढगे,धर्मेंद्र राऊत, श्रीकांत भिष्णुरकर, अंकुश गजभिये, प्रमोल शेळके यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.