संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- येत्या 18 डिसेंबरला होऊ घातलेल्या कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतच्या 27 सरपंच व 93 प्रभागातील 247 सदस्य पदाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालावधीत आज 6 डिसेंबर ला गादा ग्रामपंचायत चे सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच पदाचे उमेदवार गुणवंता दवंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले तसेच प्रभाग क्र 3 चे सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्य पदाच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आज दोन उमेदवारी अर्ज मागे घेतले असून उद्या 7 डिसेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे तेव्हा उद्या किती उमेदवार या निवडणुक रिंगणातून बाहेर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तसेच दुपारी 3 नंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार आहे