महा मेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ दीक्षित यांचा केंद्रीय मंत्री  गडकरी यांच्या हस्ते सत्कार..

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल खासदार महोत्सवात झाला सत्कार

नागपूर : महा मेट्रो नागपूरच्या वर्धा रोड डबल डेकर व्हाया-डक्टची संपूर्ण जगात मेट्रो श्रेणीतील सर्वात लांब डबल डेकर म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने आज केंद्रीय महामार्ग, रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते मेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रजेश दीक्षित यांचा आज सत्कार करण्यात आला. शहरातील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरु असलेल्या खासदार महोत्सवांतर्गत डॉ दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला.

“गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड अंतर्गत नागपूरचे नाव या निमित्ताने नोंदवल्याने मी डॉ दीक्षित यांचे मनापासून अभिनंदन करतो. सोबतच त्यांचे सहकारी संचालक (स्ट्रॅटेजिक प्लांनिंग) श्री अनिल कोकाटे आणि महा मेट्रोचे माजी संचालक (प्रकल्प) श्री महेश कुमार यांचे देखील अभिनंदन करतो” असे मंत्री नितीन गडकरी या प्रसंगी बोलताना म्हणाले. महा मेट्रोमुळे हा डबल डेकर पूल भारतात पहिल्यांदा झाला आहे आणि आपण त्याचा उपयोग करीत असल्याचे ते म्हणाले.

या निमित्ताने देखील मी त्यांचे अभिनंदन करतो असे देखील ते म्हणाले. या शिवाय मी मेट्रोच्या सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देतो असे देखील ते म्हणाले. या वर्षी माझ्या विभागाशी किंवा कामाशी संबंधित गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संबंधी ८ विविध नोंदी झाल्या असून याचा मला अतिशय आनंद झाल्याचे ते म्हणाले.

या अतिशय मानाच्या आणि विश्वप्रसिद्ध रेकॉर्डसाठी महा मेट्रोच्या प्रकल्पाची निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. नजीकच्या काळात महा मेट्रो या सारखे आणखी काही विक्रम कायम करणार आहे यात शंका नाही. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ची मान्यता मिळणे हे महामेट्रो नागपुरातील प्रकल्प किती उत्कृष्टपणे राबवत आहे याचे खरे द्योतक आहे.

या आधी महा मेट्रोला केवळ सर्वात लांब डबल डेकर व्हाया-डक्टसाठी नव्हे तर या शिवाय डबल डेकर व्हाया-डक्टवर बांधलेल्या सर्वात जास्त मेट्रो स्टेशनसाठी आशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डतर्फे मानांकन मिळवले आहे. इथे हे नमूद करणे महत्वाचे आहे कि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 10 जुलै 2022 रोजी कन्व्हेन्शन सेंटर, एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात या दोन्हीही दोन रेकॉर्डसाठी डॉ दीक्षित यांना प्रमाणपत्रे प्रदान करत त्यांचा सत्कार केला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कार्यालयाचे आवारात उभा जप्त ट्रक तहसिल कार्यालयाचे आवारातुन चोरणाऱ्या आरोपीस अखेर पारशिवनी पोलिसाने पकड़ले

Mon Dec 5 , 2022
पारशिवनी :- पोलीस स्टेशन पारशिवनी यांनी तपास करीत अखेर गोडखैरी येथिल लाजस्टिक पार्क येथुन गेट नंम्बर ४ येथुन पकड़ला व चालक पोलिसाना पाहुन पसार झाल्याने तपास अधिकारी पो उप निरिक्षक दिलीप बासोडेे. पोलिस हवलदार मुद्दस्सर जमाल, सिपाई अमित यादव चालक सिपाई संदिप बड़ेकर यांनी ट्रक जप्त करून ३ डिसेंबर शनिवार रात्री पारशिवनी पोस्टे येथे आणुन जप्त केला असुन प्राप्त माहीती […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!