ट्रक बांध्यात उलटला, चालकाचा जागेवरच मृत्यु

– आज १ डिसेंबरची चाचेर शिवारातील घटना

रामटेक :-  आज दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ८:३० ते ९:३० वाजताच्या सुमारास मौदा तालुक्यातील चाचेर शिवारात ट्रक बांध्यात उलटुन भीषण अपघात झाला. ज्यामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. केशव शामराव काले वय ३८ रा. स्मॉल फॅक्टरी एरिया नागपूर असे मृतक चालकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कोराडी येथे एमएच ४०/ एन ६७६७ क्रमांकाच्या ट्रकने चालक केशव शामराव काले ( ३८,रा.स्मॉल फॅक्टरी एरिया नागपूर ) हा मौदा तालुक्यातील नवेगाव येथे अल्ट्राटेक कंपनीत सिमेंट भरण्यासाठी जात होता.दरम्यान चाचेर शिवारातील पेट्रोल पंपसमोर त्याचे ट्रकवरील नियंत्रण बिघडले आणि ट्रक ध्यानाच्या बांध्यात जाऊन उलटला. यामध्ये ट्रकच्या समोरील भागाला मोठे नुकसान झाले. अपघात एवढा भिषण होता की चालक केशव चा जागेवरच मृत्यु झाला. दरम्यान या घटनेची माहिती महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट अल्ट्राटेक सिमेंट कंपनी कोराडीचे सुपरवायझर राकेश गेंदलाल मोहने ( ३२,रा.चाचेर बाजार चौक वार्ड नंबर ४) यांना प्राप्त झाली. त्यांनी लगेच ही माहिती रामटेक पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे यांना सांगितली.माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.या प्रकरणात रामटेक पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधानाच्या कलम २७९,३०४ (अ),४२७, भा दं वी आर/डब्ल्यू १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अमलदार मनोहर राऊत हे पुढील तपास करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘ऊर्जा कार्यक्षम प्रकल्पांच्या वित्तपुरवठ्याची गुंतवणूक बाजार’ विषयावर परिषदेचे आयोजन

Fri Dec 2 , 2022
नागपूर :-  ऊर्जा कार्यक्षम प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी तसेच अडथळे दूर करण्यासाठी एनर्जी एफिशिअन्सी फायनान्सिंग प्लॅटफार्मअंतर्गत ऊर्जा दक्षता ब्युरो, नवी दिल्ली व महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यावतीने “ऊर्जा कार्यक्षम प्रकल्पांच्या वित्तपुरवठ्यासाठी गुंतवणुक बाजार” या विषयावर एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. महाऊर्जाचे महाव्यवस्थापक पंकज तागडपल्लेवार यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रादेशिक संचालक वैभव पाथोडे, अमरावती विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे, ऊर्जा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!