सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 145 प्रकरणांची नोंद ,उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवारी (29) रोजी शोध पथकाने 145 प्रकरणांची नोंद करून 107200 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आलेली आहे. उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर 12 प्रकरणांची नोंद करून रु 2400 रुपयांचा दंड वसुल केला. सगळयांवर प्रत्येकी रु 2०० प्रमाणे दंड लावण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी रस्ता फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी/उघडयावर मलमुत्र विर्सजन करणा-यांवर 4 प्रकरणांची नोंद करुन रु 2000 रुपयांचा दंड वसुल केला.हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 7200 रुपयांची वसुली करण्यात आली. कोणत्याही व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 100/- दंड) या अंतर्गत 42 प्रकरणांची नोंद करून 4200 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून रु 2800 दंड वसूल करण्यात आलेला आहे. शैक्षिणिक संस्था, कोचिंग क्लासेस अश्या संस्थांनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे (रु. 1000/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 1000 दंड वसूल करण्यात आलेला आहे.मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींगचे हॉटेल, सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस इत्यादींना रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 2000/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून रु 4000 दंड वसूल करण्यात आला. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून रु 12000 दंड वसूल करण्यात आला. वैद्यकिय व्यवसायिकांनी बॉयोमेडीकल वेस्ट सर्वसाधारण कच-यात टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून रु 50000 दंड वसूल करण्यात आला.

या व्यतिरिक्त इतर 38 व्यक्तिविरुध्द प्रकरणांची नोंद करून 7600 रुपयेचा दंड वसूल करण्यात आला. उपद्रव करणा-या संस्थांकडून 14 प्रकरणांमध्ये 14000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.

मनपा आयुक्त आणि प्रशासक  राधाकृष्णन बी यांचा मार्गदर्शनात उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांचा नेतृत्वात उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोनचे प्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोनचे धर्मराज कटरे , हनुमान नगर झोनचे  पवन डोंगरे, धंतोली झोनचे नरहरी वीरकडे, नेहरूनगर झोनचे नत्थू खांडेकर, गांधीबाग झोनचे सुशील तुपते, सतरंजीपूरा झोनचे प्रेमदास तारवटकर, लकडगंज झोनचे सुधीर सुडके, आशीनगर झोनचे संजय सोनोने आणि मंगळवारी झोनचे नरेंद्र तुरकर यांनी आपल्या जवान सोबत कारवाई केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

'अनुवादाच्या माध्यमातून रोजगाराच्या सुवर्ण संधी ' विषयावर व्याख्यान विद्यापीठातील पदव्युत्तर हिंदी विभागाचे आयोजन

Wed Nov 30 , 2022
अमरावती :-अनुवादाच्या माध्यमातून रोजगाराच्या सुवर्ण संधी या विषयावर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाच्या वतीने नुकतेच व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत खडके होते, तर प्रमुख वक्ता म्हणून अनुवाद हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी व सध्या नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे राजभाषा व्यवस्थापक म्हणून कार्यरत राहुल खटे उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना प्रमुख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com