संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री येथील नितेश किराणा स्टोर्स दुकानातुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांने शटरचे लाॅक तोडुन आत प्रवेश करित एकुण २१,७०० रु.चा मुद्देमाल चोरी करून नेल्याने कन्हान पोलीसानी दुकानदार नितेश केसरवाने यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.१२) ऑक्टों बर ला सकाळी ६ वाजता दुकानदार नितेश रामबाबु केसरवाने वय ४० वर्ष राह. वार्ड क्र.४ जे एन रोड कांद्री कन्हान यांची पत्नी दिपमाला केसवाने वय ३६ वर्ष ही मुलांन करिता ब्रेड घेण्याकरिता घरातुन दुकाना चा दरवाजा उघडला असता दुकानातील सामान अस्त व्यस्त दिसुन आल्याने त्यांच्या पत्नीने नितेश ला आवा ज दिल्याने येऊन पाहिले असता दुकानाचे शटर व दुकाना बाहेरील सीसीटीवी कँमरे तुटलेले दिसले असु न दुकानाची पाहणी केली तर दुकानातील १) गल्या मधुन नगदी १६,००० रू, २) ५ किलो बदाम भरणी किंमत ३४०० रु, ३) अंडे दोन ट्रे किंमत ३०० रु , ४) शॅम्पु बाॅटल १० नग १००० रु, ५) बाॅडी डिओ ४ नग १००० रु. असा एकुण २१,७०० रूपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने दुकानाचे शटर चे लाॅक तोडुन आत प्रवेश करित सामान चोरी करून नेल्याने कन्हान पोलीसांनी नितेश केसरवाणे यांचा तक्रारी वरून पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप.क्र ५९४/२२ कलम ३८०, ४५७ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.