नागपूर जिल्ह्यात करणार 5000 युवकांची नोंदणी – युवा प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे
नागपूर :- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच मेक इंडिया नं. 1 मोहिमेची सुरुवात केली. देशभरातील युवकांना यामध्ये जोडण्याच्या हेतूने ‘आप’ युवा आघाडीच्या वतीने युथ विथ मेक इंडिया नंबर 1 मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात 5000 युवकांना या अभियानात सामील करणार असल्याचे ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी नागपूर विदर्भ हिंदी साहित्य संमेलन मध्ये युवकांना संबोधित करताना सांगितले. मोहिमेच्या नोंदणीसाठी मिस्ड कॉल नंबर यावेळी जाहीर करण्यात आला.
शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सन्मान आणि शेतीच्या क्षेत्रात भारताला सर्वोच्च स्थानी पोहचवण्यासाठी ही मोहीम शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करावी यासाठी आंदोलन उभारणार असल्याचे शिंदे म्हणाले.
युवा आरोग्य दूत, शिक्षामित्र, युवा शिवार संवाद आणि उद्यम सखी या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांचे जाळे राज्यभर तयार करणार असल्याचे राज्य संघटक संदीप सोनावणे यांनी सांगितले.
आप विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनात आप युवा आघाडी च्या या कार्यक्रमात प्रामुख्याने आप महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजीत सिंग, शहर अध्यक्ष कविता सिंघल, महाराष्ट्र IT हेड अशोक मिश्रा, लीगल सेल प्रमुख एड. राजेश भोयर, सचिव भूषण ढाकुळकर, संघटन मंत्री शंकर इंगोले, आप युवा आघाडी विदर्भ संयोजक पियुष आकरे राज्य समिती सदस्य कृतल आकरे, पूर्व विदर्भ संघटन मंत्री सौरभ दुबे, युवा जिल्हाध्यक्ष ऋषभ वानखेडे, युवा अध्यक्ष श्याम बोकडे, सचिव प्रतीक बावनकर,आकाश वैद्य, स्वप्नील सोमकुंवर, शुभम मोरे, पंकज मेश्राम, ऋषभ थुल, गौरव रामटेके, विनीत गजबिये,सोनु खडगी, मृनाली वैद्य, श्रुती सोमकुंवर, पंकज मेश्राम, कुणाल मंचलवार, अंकुश रामटेके, रुद्राक्ष सोईन, रजत जिबकाटे, रोहन धवड, निषाद गोंदे, दीपक भाताखोरे, सोहेल शेख, देवेंद्र समर्थ, कुणाल मंचलवार, विशाल पटले, विशाल वैद्य, अश्विन मोटघरे, अनुप खड्डकर, ऋषभ थुल सह मोठ्या संख्येत नागपूर जिल्ह्यातील युवक उपस्थित होते.