संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठीता प्र 26 :- कामठी शहर व ग्रामीण भागातील विविध गावात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा कायम ठेवत बाबासाहेब कृषी उत्पन्न मार्केट यार्ड शुक्रवारी बाजार परिसरात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . नागपूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे हस्ते बैलजोडीची पूजा आरती व शेतकऱ्यांचा सत्कार करून पोळा उत्सव कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष माया चौरे, नगरपरिषद माजी उपाध्यक्ष अजय कदम ,नगरसेवक लालसिंग यादव ,प्रतीक पडोळे, मूलचंद सीरिया, जुने कामठीचे ठाणेदार राहुल शिरे , बाजार समितीचे संचालक सुधीर शहाणे, नवलकिशोर दडमल ,रामेश्वर बावनकर सह मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सचिव विकास बोबडे यांनी केले .
तालुक्यातील लिहीगाव येथे पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला लिहिगाव ग्रामपंचायतचे सरपंच झोड यांचे हस्ते आंब्याच्या तोरणाखाली उभे केलेल्या जोडीची पूजा, आरती करून शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपसरपंच सुनीता ठाकरे, माजी सरपंच जामुवंत ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र निकाळजे, सुषमा ठाकरे, विशाखा बोरकर, हरीश निकाळजे, सुनीता सोनटक्के ,ग्रामविकास अधिकारी शाम उचेकर सह मोठ्या संख्येने शेतकरी व गावकरी उपस्थित होते खैरी येथे कामठी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष व खैरी ग्रामपंचायतचे सरपंच मोरेश्वर कापसे यांचे हस्ते बैलजोडीची पूजा आरती करून शेतकऱ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला यावेळी उपसरपंच विना रघटाटे, ग्रामपंचायत सदस्य नथू ठाकरे ,हृदय सोनवणे ,दिनेश मानकर, विजया शेंडे, प्रीती मानकर, सुजाता डोंगरे ,मुरली तळेकर ,ग्रामविकास अधिकारी नीलकंठ देवगडे सह कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशिनाथ प्रधान मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते तसेच कढोली गावात सरपंच प्रांजल वाघ यांच्या मुख्य उपस्थितीत बैल पोळा साजरा करण्यात आला.