अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सर्जा बैलाचा पोळा ग्रामीण भागात साजरा केला जातो.शेतकयाच्या शेतीत राब राब राबत असणा-या बैलाचा लगीन म्हणजे पोळा हा सण साजरा करण्यात येतो.
आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे फार कमी प्रमाणात ग्रामीण भागात बैल दिसुन येतात .गावाच्या बाहेर आंब्याच्या झाडाच्या पानाची तोरण खाली बैलांना रांगेत उभे करून पोळा ग्रामीण भागात भरविला जातो.या दिवशी बैलांना नवीन कपडे तसेच सजविले जात असते. गोड पदार्थ मेजवानी दिली जात असते. घरोघरी बैलांना पुजले जात असून नवैद्य दिल्या जात असते.बैलांचा हा सण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात साजरा केला जात असतो.