पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगेची जुगार अड्ड्यावर धाड.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

 -19 जुगाऱ्याना अटक,8 लक्ष 36 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त

कामठी ता प्र 9 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुंभारे कॉलोनी, सम्राट नगर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे व सहकारी पोलीस पथकांनी धाड घालण्याची यशस्वी कारवाई गतरात्री साडे अकरा दरम्यान केली असून या धाडीतून 19 जुगाऱ्याना अटक करीत त्यांच्याकडून 52 तास पत्ते, नगदी 19 हजार 750 रुपये , विविध कंपनीचे 19 मोबाईल किमती 67 हजार रुपये 9 वाहने किमती 7 लक्ष 50 हजार रुपये असा एकूण 8 लक्ष 36 हजार 750 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला .

अटक 19 जुगाऱ्यात अब्दुल गफ्फार उर्फ कल्लू अब्दुल जब्बार वय 36 वर्षे रा नया गोदाम कामठी, गजफ्फर सईद मोहम्मद जहीर वय 70 वर्षे रा इस्माईलपुरा कामठी, सादिक अखतर नसीम अखतर वय 32 वर्षे रा नयागोदाम कामठी,समीर अहमद जमील अहमद वय 32 वर्षे रा वारीसपुरा कामठी,मोहम्मद इलियाज मोहम्मद जहीर वय 44 वर्षे रा भोई लाईन कामठी, महमूद अख्तर अता उलराहमान वय 45 वर्षे रा वारीसपुरा,कमाल अहमद मोहम्मद साबीर वय 50 वर्षे इमलिबाग कामठी, जावेद अख्तर खलील अहमद वय 47 वर्षे रा कोळसा टाल, राजकुमार सेठिया वय 56 वर्षे रा रणाळा , मोहम्मद जहिर अब्दुल सत्तार वय 65 वर्षे लकडगंज ,सचिन लोहे वय 30 वर्षे दाल ओली , दशरथ महादेव कापसे वय 40 वर्षे रा फेरूमल चौक , रिजवान अख्तर मोहम्मद अश्फाक वय 45 वर्षे रा इस्माईलपुरा , सतीश श्यामराव आसवले वय 51 वर्षे रा गणेशपेठ नागपूर,मो आरिफ अब्दुल रशीद वय 40 वर्षे रा बी बी कॉलोनी, विष्णू शंकरलाल गौर वय 62 वर्षे रा संत्रा मार्केट नागपूर, नाजीम खान रसुल खान वय 52 वर्षे रा मचीपूल ,एहफाज अहमद अनावरुल हक्क वय 54 वर्षे रा सैलाब नगर ,मोईन अख्तर नियाज अहमद वय 48 वर्षे रा नयाबाजार कामठी असे आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड, एसीपी नयन आलूरकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे , दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या माँर्गदर्शनार्थ डी बी स्कॉड चे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे , पोलीस हवालदार पप्पू यादव,संतोषसिह ठाकूर,अखिलेशराय ठाकूर,निलेश यादव,मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर,अतुल राठोड,सुधीर कनोजिया,संदीप गुप्तां, उपेंद्र यादव,सुरेंद्र शेंडे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पाहा कोणी कोणी घेतली शपथ

Tue Aug 9 , 2022
मुंबई – शिंदेःफडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार राजभवन येथे 11 वाजता पार पडला. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नव्या मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. शपथ घेतलेल्या मंत्र्यांची नावं शिंदे गटाकडून – तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!