आईचे नवोदय अधुरे स्वप्न पूर्ण केले रिहान ने पण ते पाहण्यासाठी आईच जीवंत नाही

अमरदिप बडगे , प्रतिनिधी 

गोंदिया – जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील एका छोट्याशा गावातील रिहान ने नवोदय परिक्षेत घवघवीत यश संपादन केले.हे स्वप्न होते आईचे परंतु ते यश पाहण्यासाठी आज त्यांची आईच जीवंत नाही.

प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलाने चांगले शिक्षण घ्यावे.असेच रिहान भुपेन्ददास बन्सोड राहणार जमुनीया असुन असीम सराफ सेंट्रल अकेडमी चुरडी येथे शिक्षण घेत होता. त्यांने नुकतेच नवोदय परिक्षेत उत्तीर्ण होऊन आई संध्या बन्सोड चे स्वप्न पूर्ण केले आहे.आईला वाटायचे की आपल्या रिहान ने नवोदय परिक्षा उत्तीर्ण करावी.अशी तीची मनोमन इच्छा होती.परंतु निसर्गाने आपला वेगळाच डाव साधला 13 फेब्रुवारीला अचानक संध्या बन्सोड रिहानची आईचे निधन झाले. अशा परिस्थितीत देखील रिहान डगमगला नाही . त्यांच्या डोळ्यापुढे होते आईचे नवोदय उत्तीर्णचे स्वप्न रात्र दिवस अभ्यास करून शेवटी रिहाने नवोदय पुर्ण उत्तीर्ण करून आईचे स्वप्न पूर्ण केले. पण त्यांचे यशाची पाठीवर धाप मारणारी आईच आज जीवंत राहील नाही.खरंच आज रिहान ची आई जीवंत असती तर रिहाने यश पाहून नक्कीच आनंदी झाली असती .पण नियतीच्या पुढे कुणाचे काही चालत नाही.म्हणतात ना तेच खरं! शाबास रिहान तुझ्या सारखी मुलांची आज गरज देशाला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

हर घर तिरंगा अभियान : सेल्फी स्टँडचे लोकार्पण

Tue Jul 19 , 2022
प्रत्येकाने अभियानात सहभागी होण्याचे आयुक्तांचे आवाहन नागपूर : केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी अमृत महोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा अभियान’ राबविण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत सेल्फी स्टँडचे मनपा आयुक्त आणि प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी (ता.१८) मनपा प्रशासकीय इमारत येथे लोकार्पण केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, उपायुक्त  रवींद्र […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!