संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी – नागपूर महानगरपालिकेच्या व नागपूर सुधार प्रण्यास अंतर्गत निर्धारित केलेल्या सीमेअंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत रनाळा येथील रिकामे प्लॉट धारक व ग्रामपंचायत व नागपूर सुधार प्रन्यास कडून बांधकामाची परवानगी घेऊन पक्के बांधकाम केलेल्या घरमालका ना त्यांचे प्लॉट व घरे नियमित करण्यासाठी शासनाने नव्याने सामान्य जनतेला न झेपणारा कर आकारून नोकरी वर्ग शेतकरी शेतमजूर व व्यापारी वर्गा तील प्लॉट धारक व घर मालक यांचा आर्थिक व मानसिक त्रास कमी व्हावा करिता शासनाच्या माध्यमातून सामान्य जनतेला आर्थिक सूट मिळवून द्यावी व रणाळा गावातील नवीन डी पी प्लॅन तयार करून स्थानिक जनतेला निर्धारित कर आकारणी कमी करून न्याय मिळवून द्यावा या हेतूचे निवेदन ग्रामपंचायत रनाळा येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज साबळे यांच्या नेतृत्वात माजी ऊर्जा मंत्री व आ. चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल फुकटे प्रदीप सपाटे, चेतन खुल्लरकर, प्रभाकर नवले यासहित गावातील इतर सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.